जे सांगायचे आहे मला , ते न बोलता तुला कळेल का ?
पाहते आहे जे स्वप्न मी ... तेच स्वप्न तुला ही पडेल का ?
कविता माझ्या प्रितीची , तुला कधी समजेल का ?
तुझेही ह्रुदय माझ्यासाठी ... सूर प्रेमाचे कधी छेडेल का ?
बोलू नकोस काहीच ... पण फक्त् नजरेचा एक इशारा देशील का ?
मी केलं आहे तितकंच प्रेम तूही कधी माझ्यावर करशील का ???
No comments:
Post a Comment