Sunday, May 9, 2010
तूझं माझ्या आयुष्यात येण
तूझं माझ्या आयुष्यात येण
मैत्रीचा 'संदेश' देऊन गेलं,
निराधार झालेल्या मनाला
आधार देऊन गेलं
तूझं माझ्या आयुष्यात येण
मला क्षणोक्षणी हसवून गेलं,
हरवलेल्या बालपणाची
पुन्हा एकदा आठवण करुन गेलं
तूझं माझ्या आयुष्यात येण
मला नवजन्म देऊन गेलं
रंग विसरु पाहाणाऱ्या 'चित्रा'ला,
रंगाची आठवण करुन गेलं
तूझं माझ्या आयुष्यात येणं
मला माझं वेगळेपण दाखवून गेलं,
मैत्री ह्या नात्याची
गरज निर्माण करुन गेलं
तूझं माझ्या आयुष्यात येणं
मला खुल्या आकाशात घेऊन गेलं,
जीवनाच्या ह्या वाटेवर
खऱ्याखुऱ्या मित्राची साथ देऊन गेलं
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment