It's Only Collection that I Liked! Nothing My own!
In this blog you get all types of Marathi Poems like Marathi Prem Kavita, Miss You Kavita, Ek Tarfi Prem Kavita, Marathi Sad Love Poems, Virah Kavita, Lonely Marathi Poems, Need You Marathi Poems n all....
Collection of more than 100 Marathi Poems Kavita.
Thank You For Visiting!!!!!!
Wednesday, May 19, 2010
काय जादू असते या मैत्रीत !
काय जादू असते या मैत्रीत !
मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी प्रेम अन् विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन् श्वास
कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच शिंपले...
विविध रंगांचे, विविध आकारांचे, विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावा
लगद उघडावा
अन् त्यात मोती सापडावा
खर्राखुर्रा, तुझ्यासारखा
खरं सांगू का !
मोतीसुद्धा लाभावा लागतो
तुझ्यासारखा....!
छान सुन्दर आणी सधी ......
छान सुन्दर आणी सधी ..............................
मैत्रि तुझी अशी असवी,
आयुश्यभर सोबत राहावी,
नको कधि त्यात दुरावा ,
नेहमीच नवा फ़ुलोरा,
मैत्रि अपुली अशी असावी,
सर्वांना एकत्रित अनावी,
हसने रुसने चालत राहवे,
एकमेकांना समजुन घ्यावे,
मैत्रि आपण अशी जगवी,
एकमेकांचा आधार असावी,
सुख दुखात नेहमी सोबत असवी,
असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,
तुझी मझी मैत्रि अशी असावी
आयुष्य कोडं म्हणून पाहीलं
आयुष्य कोडं म्हणून पाहीलं
तर सोडवणं अवघड होवून बसतं
उत्तरांच्या असंख्य पारंब्या फुटून
एक भलं मोठं वडं होवून बसतं
सरळ साधं जगणं सोडून, आपण
मोह मायेच्या दूनियेत गुंतत जातो
प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता
उत्तरांनाचं प्रश्नात गुंफत जातो
सुर्याकिरणात चमकणारा दव
मोती बनून मिरवू लागतो
येताच वाऱ्याची एक झूळूक
शेवटी मातीतच हरवू लागतो
प्रत्येक गोष्टीचा अंत असतो
निसर्ग क्षणाक्षणाला शिकवतो
इवलासा दव पण जिवनातलं
सर्वात स्वच्छ प्रतिबिंब दाखवतो
निसर्गाला आयुष्याचा गुरू मानून
कर्तव्याची दुर्वा वहायची असते
आयुष्याला निसर्गासारखं वाहू द्यावं
विणाकारण पर्वा करायची नसत
चुक मी केली त्या क्षणी ..
चुक मी केली त्या क्षणी ..
तीळ तीळ तोड़ते ती मला प्रत्येक क्षणी..
प्रेम केले तिने माझ्यावर बिनशर्त..
पन माझ्या प्रेमात होती फ़क्त शर्त
मला तिच्या स्वप्नातला राजकुमार म्हणत होती..
तिच्या स्वप्नांकडे पहायला तेव्हा फुरसतच नव्हती ...
रात्रि जागुन काढल्या तिने आठवानित माझ्या ...
मी निर्धास्त झोपलो सोडून आठवणी तिच्या ....
बोलने माझे तिच्या डोळ्यात पानी टचकन आणायचे..
तिच्या डोळ्यात पानी पाहून मन आनंदून जायचे..
झुगारून प्रेम तिचे, वैरी जालो मी तिच्या प्रेमाचा....
"नेहमी खुश रहा"..म्हणुन निरोप दिला तिने प्रेमाचा...
आज तिच्या आसवांची किंमत माला कलते आहे....
माझ्या आसवानी त्याची परतफेड मी करतो आहे.....
चुकलो, चुकलो मी म्हणुन मन माझे रडते आहे...
रोज तिला शोधण्यासाठी आकाश पाताल एक करतो आहे...
Saturday, May 15, 2010
जे सांगायचे आहे मला
जे सांगायचे आहे मला , ते न बोलता तुला कळेल का ?
पाहते आहे जे स्वप्न मी ... तेच स्वप्न तुला ही पडेल का ?
कविता माझ्या प्रितीची , तुला कधी समजेल का ?
तुझेही ह्रुदय माझ्यासाठी ... सूर प्रेमाचे कधी छेडेल का ?
बोलू नकोस काहीच ... पण फक्त् नजरेचा एक इशारा देशील का ?
मी केलं आहे तितकंच प्रेम तूही कधी माझ्यावर करशील का ???
*फ़क्त तू आणि तूच.......
*फ़क्त तू आणि तूच.......
कधी कधी वाटतं की हा
पाउस असाच बरसावा
अगदी एकही क्षण न थांबता
बरसताच जावा
आणि मी त्यच्या बरसण्यात
अगदी चिम्ब चिम्ब भिजावं
नुसतं भिजत जाव, भिजत जाव
इतक भिजावं की तुझ्या सगळ्या
अगदी सगळ्या आठवणी धुवून काढाव्यात..
मी भिजतोही अगदी स्वताला चिंब करतो
अगदी नखशिखांत भिजवतो
आटोकाट प्रयत्न करतो तुला विसरण्याचा........
काही काल तर अगदी स्वतः ला विसरतो
आणि बघतो तुला कित्ती विसरलोय
हं ... पण पुन्हा तिथेच, तिथेच त्याच पावसात ...
स्वतः ला विसरलो तरीही
तुझी आठवण मात्र तितकीच, तितकीच...
अगदी पावसाचा पहिला थेंब
अंगावर झेलताना जेवढी असते ना तितकीच..... तितकीच तू
फ़क्त तू आणि तूच.......
संतोष नार्वेकर
माझ्या कवितेतील सर्व ओळी तुझ्या साठी
माझ्या कवितेतील सर्व ओळी तुझ्या साठी.
त्या ओळीतिल सर्व अर्थ तुझ्या साठी
त्या अर्थातिल माझ मन तुझ्या साठी
त्या मनातले सर्व भाव तुझ्या साठी....
आणि माझा छातीत धड धडणार हे
प्रेमळ ह्रदय देखिल तुझ्याच साठी......
फ़क्त तुझ्या साठी...
संतोष नार्वेकर...
Sunday, May 9, 2010
जुन्या वहीची पानं चाळताना
जुन्या वहीची पानं चाळताना
मोरपीस हातात पडतं
मोरपीस गालावर फ़िरताना
आठवणींशी नातं जडतं
या आठवणींत बुडुन जाताना
आजचं नाही उरत भान
क्षण ते परत ना येतील आता
तीच होती सुखाची खाण
आठवणी असतात अनेकांच्या
तुमच्या, माझ्या, सर्वांच्या
प्रत्येकाची असते एकतरी आठवण
दु:खाची अथवा सुखाची साठवण
माझ्याही आहेत अशाच आठवणी
पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या
जीवन झाल्या त्याच आठवणी
सुवर्णरुपी गतकाळाच्या
ह्रुदयात या रुजुनि गेल्या
काही त्यातल्या बुजुनही गेल्या
मनात काहींनी घर केले
पण...
क्षण आता ते उडुन गेले
आठवणी आठवाव्या लागत नसतात
आपोआप त्या आठवत असतात
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे
सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात...
तूझं माझ्या आयुष्यात येण
तूझं माझ्या आयुष्यात येण
मैत्रीचा 'संदेश' देऊन गेलं,
निराधार झालेल्या मनाला
आधार देऊन गेलं
तूझं माझ्या आयुष्यात येण
मला क्षणोक्षणी हसवून गेलं,
हरवलेल्या बालपणाची
पुन्हा एकदा आठवण करुन गेलं
तूझं माझ्या आयुष्यात येण
मला नवजन्म देऊन गेलं
रंग विसरु पाहाणाऱ्या 'चित्रा'ला,
रंगाची आठवण करुन गेलं
तूझं माझ्या आयुष्यात येणं
मला माझं वेगळेपण दाखवून गेलं,
मैत्री ह्या नात्याची
गरज निर्माण करुन गेलं
तूझं माझ्या आयुष्यात येणं
मला खुल्या आकाशात घेऊन गेलं,
जीवनाच्या ह्या वाटेवर
खऱ्याखुऱ्या मित्राची साथ देऊन गेलं
! .....मित्र.....!
! .....मित्र.....!
हाच तर जिवलग मित्र असतो...
१ दिवस फोन नहीं केला तर रागवतो
फोन केला तरीही शिव्या घालतो
समोरून एखादी फाकडू पोरगी जात असेल तर
तिच्या समोर मस्त पोपट करतो
कॉलेज ला आल्यावर पहिला कॉल आपल्याला करतो
कुठे आहेस म्हणुन विचारतो
पिकनिक ला जाताना
आई बाबांना हाच तर मस्का लावायला कामी येतो
बाइक वरून पडलो की सगळे हसत असताना
धावत येउन उचलतो
आपण विसरलो तरीही
वाढदिवशी १२ वाजता बरोबर मेसेज करतो
परिक्षेच्या वेळी
सुपरवायज़रला घाल चुलीत म्हणुन सप्प्लिमेंट हातात देतो
काही चुकले तर ओरडतो
गरज असेल तर कान पीळतो
इतर मित्रांच्या तुलनेत
आपली जास्त काळजी घेत असतो
हाच असतो जो
आपल्या कृष्ण-धवल आयुष्यात रंगांची उधलन करत असतो
दुखात असताना.. जवळ येउन काय झाल..? म्हणुन विचारतो
आपण नजर खाली करून काही नाही म्हणुन त्याला टाळतो
आपल्या डोळ्यात बघून
काय रे एवढा परका झालो का..? असा उलट प्रश्न करतो
सुखात हक्काने पार्टी मागणारा
आणि दुखात रडायला खांदा देणारा हाच तर जिवलग मित्र...
Tuesday, May 4, 2010
पुन्हा प्रेम करणार नाही
पुन्हा प्रेम करणार नाही.....
भेट आपली शेवट्ची असुन
निरोप घेत आहे…
वरुन शांत असले तरी
ह्र्दयात रडत आहे…
जात आहे सोडुन मला
नाही अडवणार मी तुला…
असशील तिथे सुखात रहा
याच शुभेच्छा तुला…
निरोप तुला देताना
अश्रु माझे वाहतील….
काऴजाच्या तुकड्याना
सोबत वाहुन नेतील…
त्या वाहणारय़ा अश्रुतही
प्रतिबिंब तुझेच असेल…
निट निरखुन पहा त्याला
प्राण मात्र त्यात दिसेल…
वाट आपली दुभंगली आता
परत भेटणे नाही…
प्रवास जरी एक आपला
मार्ग एक होणे नाही…
आठवण तु ठॆवु नकोस
मी कधीच विसरणार नाही…
भेटणे तुझे अशक्य तरी
वाट पाहणे सोड्णार नाही…
जातेस पण जाताना एवदे सांगुण जाशील का?
भेट्लो जर कधी आपण …
ओळख तरी देशील का?
जाता जाता थोडे तरी…
मागे वळुण पाहाशील का?
प्रत्यशात नाही तरी…
डॊळ्य़ानी बोलशील का?
बोलली नाही तु जरी…
नजर तुझी बोलेल का?
गोधंळलेल्या अत:करणाची…
खबर मला सांगेल का?
कुठॆतरी ह्र्दयात इतिहास सारा आठवशील
तो आठवण्यापुरता तरी तु…
नक्कीच माझी राहशील
नजरेने जरी ओळखलेस तु…
शब्दानीं मी बोलणार नाही
तुझ्या माझ्या आयुष्यात…
नसती वादळ असणार नाही
नेहमीच पराभव झाला तरी….
हक्क तुझ्यावर सांगणार नाही
पण तुझी शपथ पुन्हा प्रेम करणार नाही
Subscribe to:
Posts (Atom)