Sunday, October 19, 2014

मलाही आनंदाने रडायला येतय | Marathi Prem Kavita in Marathi Font | Marathi Poems for Whatsapp, Facebook

तिला रडताना पहिल आणि
विसरलो स्वताला की आपण कुठे आहोत
आपल्या घरी की कोणाकडे आहोत
सावरता आल नाही
लपवता आल नाही
वाट करुन दिली मग अश्रुना
वाहू दिल पण गुपचुंप
नकळत स्वताच्या नकळत तिच्या
पण तीला सांगावाच लागल
कारण तीच माझ अस वेगळ नाहीच
तिच्या शिवाय अस अस्तित्व नाहीच
तिला कळाव म्हणून सांगायच नव्हत
तर प्रेम व्यक्त होत होत आपोआप
म्हणून सांगीतल मनाला मोकळ केल
आता हलक वाटतय खुप हलक वाटतय
आधी पाहिल तिला रडताना आता
मलाही आनंदाने रडायला येतय...
मलाही आनंदाने रडायला येतय...
.... अंकुश नवघरे
(स्वलिखित)

No comments: