Thursday, September 18, 2014

अखेरच्या क्षणापर्यंत | Marathi Prem Virah Kavita | Marathi Virahi Kavita Blog | Marathi Lekh | Marathi Small Virah Kavita

कधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची
अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडेपर्यंत
मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे
तुझ्या बंदिस्त मनापर्यंत

अर्थात तुझ्या दिसण्याला कधी भुललो नाही
पण तुझ्या वागण्यानं तू पोहचलीस काळजापर्यंत
मला भुलावणहि काही सोप्पं नव्हतच मुळी
पण तुझ्या प्रत्येक अदेन छेडलं घायाळ होईपर्यंत

तुझं निरागस हसणं तुझं निरागस असणं
हळूहळू मनात घर करत गेलं
अन तुझ्या मनाचा गंध पसरत गेला
माझ्या मनाच्या नसा नसापर्यंत

ते ओझरते स्पर्श तो वाढत गेलेला विश्वास
मला गुरफटत गेला तुझ्यामध्ये
तू अबोल राहूनही नजरेनच तुझ बोलणं
सारं काही भिडत गेलं माझ्या हृदयापर्यंत

कधी माझं "मी" पण गळालं नाही कळलं
माझ्या मनासकट तू मला वेढून घेतलं
आता तुझच आस्तित्व घेऊन जगतो मी
तुझच प्रेम राहिलं माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत
====================================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २६. ८. १४  वेळ : ६ . १५ स .

No comments: