Sunday, September 21, 2014

एकतर्फी प्रेमाचा बाजार | Marathi Prem Kaivta For Girlfriend | Marathi Ek Tarfi Prem Kavita| One Sided Love Poems In Marathi | Marathi Poems On Girls

एकतर्फी प्रेमाचा बाजार...
प्रेम करतोस ना तिच्यावर,
मग कर फ़क्त प्रेमाचा वर्षाव
तिने ही कराव प्रेम म्हणून
आणायचा नसतो दबाव....

असेल तिचा नकार, तर
तो हि तू हसत स्विकार
तिलाही आहे ना स्वत:चा
निर्णय घेण्याचा अधिकार...

नाही म्हणाली तर तूझ्या
प्रेमाने नकाराला होकारात बदल
का नाही म्हणाली याचा विचार
करुन आधी स्वत:ला बदल...

नाही म्हणाली तर तिच्या
नकारावरही प्रेम कराव
नाही म्हणता म्हणता तिला
प्रेम करायला शिकवाव...

नको रे घेउस तूझ्या वेड्या
हट्टा पाई तिचा बळी
काय मिळणार तूला तोडून
एखादी उमलणारी कळी...

खरे प्रेम करतोस ना,
मग ठेव सच्ची निती
कशाला दाखवतोस उगाच
तिला जिवाचि भिती...

तूझे हे सच्चे रुप पाहून
कदाचित बदलेल तिचा विचार
तिलाही होईल बघ मग
तुझ्या प्रेमाचा आजार...

अखेर तरीही नसेल तिचा होकार
तर तूही घे अवश्य माघार
कशाला मांडतोस लेका असा
एकतर्फी प्रेमाचा बाजार...

No comments: