Saturday, August 30, 2014

तुला काहितरी बोलावेसं वाटत मला | Marathi Prem Kavita For GirlFriend | Marathi Kavita On Girlfriend | Marathi Kavita By Boy to His GirlFriend

तुला काहितरी बोलावेस वाटत मला.......
"तु खूप छान दिसतेसं"
असं तुला म्हणावेस वाटत मला........
अंगावर पाऊसाच्या पाण्याचा
वर्षाव झाल्यासारखं तु हसतेसं...
आणि,
आईसक्रिम खायाला नाही मिळालेल्या
लहान मुलीसारखं तु रुसतेस...
तुझ्या सहवासात राहवेसं वाटत मला.....
"तुझा स्वभाव छान आहे"
असं तुला म्हणावेसं वाटत मला........
दुर्मिळ भागातुन वाहणा-या
शितल सरितेसारख तु शांत राहतेसं....
आणि,
कोकिळेच्या मुखातुन निघणा-या
गोड आवाजासारखे तु बोलतेस....
तुझ्या दुनियेत यावेसं वाटत मला......
"माझ तुझ्यावरच प्रेम आहे"
असं तुला म्हणावस वाटत मला.....
समुद्रामधील शिँपल्यातील
मोत्यासारखं तुला माझ्या हदयात ठेवावेसं वाटत मला......
आणि,
माझ्या शेवटच्या श्वासापर्यत
 तुला जिवनभर साथ दयावेसं वाटत मला.......
    कवी-VIJAY BIRADAR.

कसे सांगू ते मी तुला | Marathi One Side Love Poems | Ek Tarfi Prem Kavita Marathi | Prem Kavita by One Side | Marathi Prem Kavita For Boyfriend and Girlfriend

कॉलेजच्या त्या दिवसात
भेटलीस तू मला ,
पाहता पाहता बघत राहिलो
तू मला आणि मी तुला .

झाली मैत्र  पक्की
आणि  वर्ष औलांडले बघता बघता ,
राहून गेले बोलायचे मनातले
कसे सांगू ते मी तुला ,

कधी भेटतेस कधी बोलतेस
मनमोकळ्या पणाने सगळ सांगतेस ,
लग्न झाल्यावर पण आज जेव्हा विचार करतो मी तुझा
फक्त आणि फक्त हसताना दिसतेस तू  मला.

प्रेम तुझं खरं असेल तर | Marathi Prem Kavita Blog | Love Poems In Marathi | Marathi Prema chya Kavita | Marathi Sad Prem Kavita

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.

  unknown author..

ती नातं तोडून गेली | Marathi Prem Virah Kavita | Marathi Emotional Kavita | Marathi Virah Kavita Sad Marathi Poems

ती नातं तोडून गेली...!!

ती नातं तोडून गेली,

शेवटी.....!!!

तिला जायाचच होतं.....

आजही.....!!!

रडतं वेड मन माझं,

कारण.....???

तिच्याशिवाय या जगात,

माझं कुणीच नव्हतं.....

आता का फरक पडेल,

तिला मी नसण्याचा.....

माझ्या भावनेशी खेळून,

तिच मन भरलं होतं.....

एक मातीच खेळणं म्हणुन,

खेळण्या पुरता निवडलं होतं.....

खर तरं तिला माझं दुःख,

कधी दिसलच नव्हतं.....

प्रेम म्हणजे काय असतं ?

फक्त एवढच.....!!!

तिला शिकायच होतं.....


स्वलिखित -
दिनांक १९/०८/२०१४...
सांयकाळी ०६:०८...
©सुरेश सोनावणे.....

समजतच नाही मला | Marathi Prem Blog | Marathi Sad Prem Kavita For Whatspp Group | Marathi Emotional Kavita

समजतच नाही मला
अस का होत.
ती आणि तीच्यापलीकडे
विषयच का जात नाही

रात्री झोपताना
सकाळी उठतानाही
मनात तीच असते
रात्री स्वप्नातही
तिच दिसत राहते
समजतच नाही मला
अस का होत

प्रेमही खूप आहे तिच्यावर
आवडतेही ती खूप
पण तिच्यासमोर
भावनाच व्यक्त होत नाहीत
समजतच नाही मला
अस का होत
ती समोर दिसताच
मन खुश होत
ती नजरेसमोरून जाताच
मन सैरभैर होत
समजतच नाही मला
अस का होत

माझ्या मनाच्या भावना
तिच्यातच का गुंततात
अन मी माझाच राहत नाही
समजतच नाही मला..

Pravin Raghunath Kale

Saturday, August 23, 2014

एक वेडी मैत्रीण होती माझी | Special Friend Kavita | My best Mad Friend Poem | मराठी कविता | Friendship Kavita | मैत्री कविता

एक वेडी मैत्रीण होती माझी ,
बोलायला लागली कि आपलंसं करून टाकणार ,
तिचं मन म्हणजे नितळ पाण्याचा झरा ,
स्वतःचा असा रंगच नाही त्याला ,

जो रंग मिसळला त्याच रंगात न्हाऊन निघणारं ,
नकळतपणे त्याच्याशीच एकरूप होणारं ,
तिला एक दिवस विचारलं,
यातले चांगले मित्र कोण कसं ग तुला ओळखता येतं,

तर म्हणे ,
हे रंग तर प्रवाहाबरोबर वाहून जातात ,
त्यांना माझ्यापासून वेगळं करता येतं ,
खरे मित्र तर ते आहेत, जे माझ्याच सारखे असतात ,
माझ्यात एवढं मिसळून जातात कि ,
त्यांना माझ्याहून वेगळं सांगता येणार नाही ,
जसा पाण्याच्या दोन थेंबामधला फरकच करता येत नाही ......


-- Author Unknown

मित्राची उणीव भासेल तेव्हा तुझाच आवाज येऊ दे कानी | Maitri Marathi Kavita | Marathi Friendship Kavita | मैत्री कविता | Love You Friend Poems

मनाला पडलेले कोडे काही केल्या सुटेना,
    तुझ्या मैत्रीला प्रेमाचे नाव देऊ कि मैत्री, काही केल्या कळेना....!
 तुझ्या मैत्रीत अशी काही जादू आहे कि मन माझे तुझ्यात गुंतत चालले आहे,
    क्षणात वाटे कि तू हि तेच अनुभवत आहेस....!
तुझ्या बोलण्यात हरवून जाते मी, तुझ्या शब्दात मलाच शोधते मी,
   तुला सारे काही कळते, पण मीच म्हणते अरे वेड्या मित्र आहोत चांगले,
मैत्रीत असेच काहीसे वागले....!
    मैत्री आपली जपायची आहे मला,
मनातील गुपित नाही कळू द्यायचे आहे तुला....!
कळाले जर तुला मैत्रीला नाही जायील तडा या एका भीतीने मनी एक काहूर उठे,
   आयुष्याचा जोडीदार नको रे पण एक मित्र चांगला नाही गमावू पाहत मी....!
मैत्री अशीच जपून ठेऊ आपण दोघे एकमेकांच्या मनी,
 मित्राची उणीव भासेल तेव्हा तुझाच आवाज येऊ दे कानी....!!!!

@ कविता @

ही खास कविता माझ्या खास मित्र मैत्रिणीसाठी | Marathi Friendship Special Kavita | Marathi Kavita On Best Friends | Friendship Maitri kavita

ही खास कविता माझ्या खास मित्र मैत्रिणीसाठी...!!

शब्द बनून,
पुस्तकांमध्ये भेटू आपण.....

सुगंध बनून,
फुलांमध्ये भेटू आपण.....

काढशील आठवण,
माझी जेव्हा.....

अश्रूं बनून,
डोळ्यांमध्ये भेटू आपण.....

i miss u friends... :'(


© सुरेश सोनावणे...

आवडत .. Prem Kavita Marathi Blog | Marathi Blogs For Marathi Kavita | Sad Prem Kavita | Missing you Kavita in Marathi Font

तिला फिरायला आवडत
अन मला
तिच्या सोबत फिरायला ..♥
.
बोलायला ही आवडत
पण ते तिच्या सोबत ..♥
.
ईतरां सोबत ही बोलतोच
पण ति माञ स्पेशल आहे ..♥
.
कधी कधी तिचे डोळे बोलतात
तर कधी
तिचा चेहराच खुप बोलून जातो ..♥
.
पण मी बोलतो,
तिच्या सोबत बोलतो ..♥
.
कधी कधी मी बोलल्यावर ति लाजते
तर कधी ति बोलल्यावर मिच लाजतो ..♥
.
पण ति बोलते,
मी माञ फक्त ऐकतो ..♥
.
मी फक्त ऐकलेलं ही
तिला आवडत नाही  ..♥
अन जास्त बोललेल ही
तिला आवडत नाही ..♥
.
मग ति म्हणेल तसेच,
अन मग ति बोलते
मी बोलतो ..♥
.
अन मग पुन्हा
फिरायला जातो
स्वत:च्या विश्वात ..♥
.
©  चेतन ठाकरे

Saturday, August 16, 2014

समोर तू दिसताना | Marathi Prem Kavita in Marathi Language | Mad in Love Marathi Kavita | Marathi Kavita Premi

समोर तू दिसताना
एकटक मी तुलाच पाहतो
नजरेला नजर भिडली
तरीही मी मूकाच राहतो
बोलत जरी तू असली
मी मात्र शांतच राहतो

समोर तू दिसताना
भान मी विसरतो
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी
तुलाच मी शोधतो
तू दिसताच मात्र
शांतच मी राहतो

समोर तू दिसताना
शब्दच मी हरवतो
तुला भेटण्याआधी
ठरवलेले सारे
बोलने मी विसरतो...
समोर तू दिसताना
मी स्वतःलाच विसरतो...

 Pravin R. Kale

Friday, August 15, 2014

मन माझे वेडे जरा | Marathi Prem Kavita | Prem veda Kavita | Marathi Poems Kavita Blog | Marathi Prem Kavita in Marathi Language

तु बघता मन माझे वेडे जरासे शहारते,
हसता नाजुक खळी तुझ्या गाली पडते...
डोळ्यात कोणते नशा ही भिनते
का सागं जीव हा गंधाळुन जाते
चादंणे वाटते तुझ्या लाजण्यासारखे...
तु बघता मन माझे वेडे जरासे शहारते,
हसता नाजुक खळी तुझ्या गाली पडते...
मिटताच डोळे अन् समोर पुन्हा तु दिसते,
का सागं अन् मला भास होत तुझे सारखे...
शोधत मी तुला वळणावरी हरवुन जात असे,
वाटे का आता मज हे वेड लागल्यासारखे...
तु बघता मन माझे वेडे जरासे शहारते,
हसता नाजुक खळी तुझ्या गाली पडते...
समोर पाहता तुला हा जीव धुदावला,
अलवार तुझ्या डोळ्यातल्या डोहात गुतंला...
साद बावर्या स्पदंनाची वाटते का आज नवी,
हा भास की तुझी नशा उमजेना या मनाला...
तु बघता मन माझे वेडे जरासे शहारते,
हसता नाजुक खळी तुझ्या गाली पडते...


©स्वप्नील चटगे.
(दि.04-08-2014)

Speacial Thanks:-
हर्षवर्धन घोडके (हर्ष)

Tuesday, August 12, 2014

हे प्रेम नव्हे या जन्माचे | Prem Marathi Kavita | Marathi Kavita on Whatsapp | Marathi Facebook Comunity | Share Marathi Poems on Blog | Marathi Kavita Blogs

अवघा रंगची एक झाला
तुझ्या माझ्या प्रेमाचा
अर्थ उलगडला आता
तुझ्या माझ्या नात्याचा

तुझे माझे भेटणे
खेळ होता विधात्याचा
हे प्रेम नव्हे या जन्माचे
हा भाव युगायुगाचा

आहेस तू राधा
मी कृष्ण जन्मजन्माचा
डोळ्यात तुझ्या पाहिला
तो भाव ओळखीचा

हि प्रीत जन्मांतरीची
ठोका चुकला काळजाचा
तो एक क्षण भेटला
मला तुझ्या नजरेचा ....

संजय एम निकुंभ , वसई
दि. २३.७.१४  वेळ : ९.१५ रा . 

सुखात माझ्या.. Marathi Kavita | Marathi Poems Read Online | Marathi Kavita in Marathi Font | Happy Marathi Kavita

सुखात माझ्या तुझा मोठा हात आहे
सरळ चालताना सुद्धा तुझीच साथ आहे,

नसताना तू सोबतीला, विरहिणी गायिल्या मी
सोबतीने तुझ्या मी, सुखाचे गीत गात आहे

भिजलो कितीदा तरी मी कोरडाच होतो,
प्रीतीच्या तुझ्या जलाशयात मी न्हात आहे,

शोधीत होतो तुला मी हर प्रकारे,
हा गुन्हा माझा मी का लपवित आहे?

नशापान केले तरी मी झिंगलो नाही कधीही
प्राशिले काय तू मजला, पुरता मी धुंदीत आहे,

निद्रेवीना या अशा किती रात्री गेल्या,
आता खरा मी तुझ्या प्रीतीत आहे,

चाली केल्या कित्येकदा मी बुद्धीबळाच्या
अखेर तूच मजवर केलीस मात आहे,

श्री. प्रकाश साळवी दि. २१/०७/२०१४