Friday, January 10, 2014

या जगात खरच किती | Online Marathi Poems | मराठी कविता | Marathi Kavita Online

या जगात खरच किती,
मतलबी लोक असतात.....

आधार घेण्यापुरता,
आपला वापर करतात.....

आणि त्याचं मन,
पूर्णपणे भरलं की.....

आपल्याला न सांगता,
एकट सोडून जातात.....

कारण विचारल तर,
तुझी ती लायकीच नाही.....

म्हणून ते आपलाच,
तिरस्कार करतात.....

आणि आपल्याला कवडीमोल ठरवून,
आयुष्याची माती करून जातात.....

आपल्याला भयानक दु:ख देवून,
ते मात्र खुप खुश राहतात.....

आपल्या एकाकी रडण्यावर हसून,
जखमेवर मीठ चोळतात.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(


स्वलिखित -
दिनांक ११-१२-२०१३...
सकाळी १०,१७...
© सुरेश सोनावणे.....

4 comments:

Anonymous said...

it is the very very best kavita manala sprsh karun geli

Anonymous said...

really heart touching marathi kavita ahe.
n its tru fact too.

Unknown said...

वणव्याची आग मी सोसली होती,
अन् दुःखाचा पुर ही मी सोसला होता.
थोडी सुखासाठी ओँजळ पसरली होती,
पण अश्रुंचा सागरच मिळाला होता.

सोबत कूणाची मी मागीतली होती,
तर फक्त दूरावाच भेटला होता.
अन् थोड़सच सूख मी मागीतल होत,
तर दुःखाचा डोँगरच मिळाला होता.

फक्त पाऊस मी मागीतला होता,
पण सारं आभाळच कोसळल होतं.
अन् स्वःताला सावरता सावरता,
माझ सारं जीवनच ढासळल होतं.

जीवनाकडून धडे शिकत असताना
एक-एक दुःख मी पचवल होतं
पण आता माझ्या लक्षात आलं की,
आपले हे जीवनच क्षणभंगूर असतं

Unknown said...

Good kavita