Friday, January 10, 2014

मी हि आहे माणूस | मराठी कविता Marathi Poems | Marathi Kavita Blog.

माझ्या न दिसणाऱ्या योनिकडे पाहून
तू जिभल्या चाटत असतोस
माझे वक्ष झाकलेले असतांनाही
तू डोळे विस्फारून पाहतोस

दिसते तुझ्या डोळ्यांत मला
लालसा फक्त माझ्या शरीराची
म्हणूनच सजा भोगते मी
खाली मान घालून चालण्याची

मी घातलेली असते साडी
तेव्हा जाते तुझी नजर उघड्या पोटाकडे
कधी घातला खोल गळ्याचा ब्लाउज
तर अधाशासारखा पाहतोस तू पाठीकडे

जरी मी घातलेला असतो सलवार कुडता
तरी तू डोकावतोस माझ्या गळ्यामध्ये
अन घातलीच मी जीन्स तर
पहातो वेड्यासारखा माझ्या ढूंगनाकडे

घालता मी आखूड चड्ड्या
पाहतो माझ्या मांड्यानकडे
काय घालू मी आता
मजलाच पडलेय रे कोडे

म्हणजे तू आहेस म्हणून
मला मनासारखं नाही वावरता येणार
मी कसं जगायचं हे हि
तूच आता ठरवणार

तू हि कसाही राहतोस
मी कधी आक्षेप घेतला कां रे
मग माझ्याच जगण्याला
तुझ्या बेड्या कां रे

मी हि आहे माणूस
मला स्वच्छंद होऊन जगू दे ना
होईन कधी मुक्त मी
मला मोकळा श्वास घेऊ दे ना .
========================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १ . १२ . १३ वेळ : ३ .०० दु .

No comments: