Sunday, October 20, 2013

विरह कविता :: विसरू कसा? Marathi Kavita मराठी कविता : Virah Kavita |

आठवायचं नाही म्हंटलं तरी
विसरु शकत नाही तुला
कारण....
विसरण्या साठी सुध्धा
आठवावच लागतं तुला

आठवलं तुला कि
आठवतात भेटी आपल्या
अन.....
विसरून जातो कि ,
विसरायचं तुला

तूच सांग सखे
विसरू कसा तुला?
अगं..
.तुझ्या शिवाय काही,
अठवणीच नाही मला .

ह्या पेक्षा म्हणतो मी
आठवत राहतो तुला
निदान...
माझ्या बरोबर नाहीयेस तू .,
हे विसरायला होईल मला.



केदार.... 

No comments: