Sunday, October 20, 2013

प्रेम करण शिकाव माझ्याकडून : Marathi Kavita : मराठी कविता : Prem Kavita | प्रेम कविता


पाकळीने कोमलता पहावी तुझ्या ओठांची
सागराने गहेराई शोधावी तुझ्या डोळ्यांची
नादीने खळखळणे शिकाव बघ तुझ्याकडून
फक्त एक कमी आहे गं तुझ्यात ,
प्रेम करण शिकाव माझ्याकडून..

कोकीळेने मधुरता ऐकावी तुझ्याकडून
फुलांने मग सुगंधही घ्यावा तुझ्याकडून
सरींनी सुद्धा बरसणे शिकाव तुझ्याकडून
फक्त एक कमी आहे गं तुझ्यात ,
प्रेम करण शिकाव माझ्याकडून..

ढगांनेही पाहत राहावे काळ्याभोर या केसांस
इंद्रधनुही रंग घेई  रंगीत तुझ्या डोळ्यात  
दुक्खानेही सुखं शिकाव गालाच्या त्या खळीत
फक्त एक कमी आहे गं तुझ्यात ,
प्रेम करण शिकाव माझ्याकडून..

सूर्य मग न अस्त होई पाही तोही तुझ्याकडे
चंद्राला मग प्रकाश देई पुन्हा पहाया तुलागडे
लाजळूनेही लाजण शिकाव बघ तुझ्याकडून
फक्त एक कमी आहे गं तुझ्यात ,
प्रेम करण शिकाव माझ्याकडून..

* सागर बडे *

1 comment:

Anonymous said...

सूर्य मग न अस्त होई पाही तोही तुझ्याकडे
चंद्राला मग प्रकाश देई पुन्हा पहाया तुलागडे
लाजळूनेही लाजण शिकाव बघ तुझ्याकडून
फक्त एक कमी आहे गं तुझ्यात ,
प्रेम करण शिकाव माझ्याकडून..