Sunday, October 20, 2013

प्रेम करण शिकाव माझ्याकडून : Marathi Kavita : मराठी कविता : Prem Kavita | प्रेम कविता


पाकळीने कोमलता पहावी तुझ्या ओठांची
सागराने गहेराई शोधावी तुझ्या डोळ्यांची
नादीने खळखळणे शिकाव बघ तुझ्याकडून
फक्त एक कमी आहे गं तुझ्यात ,
प्रेम करण शिकाव माझ्याकडून..

कोकीळेने मधुरता ऐकावी तुझ्याकडून
फुलांने मग सुगंधही घ्यावा तुझ्याकडून
सरींनी सुद्धा बरसणे शिकाव तुझ्याकडून
फक्त एक कमी आहे गं तुझ्यात ,
प्रेम करण शिकाव माझ्याकडून..

ढगांनेही पाहत राहावे काळ्याभोर या केसांस
इंद्रधनुही रंग घेई  रंगीत तुझ्या डोळ्यात  
दुक्खानेही सुखं शिकाव गालाच्या त्या खळीत
फक्त एक कमी आहे गं तुझ्यात ,
प्रेम करण शिकाव माझ्याकडून..

सूर्य मग न अस्त होई पाही तोही तुझ्याकडे
चंद्राला मग प्रकाश देई पुन्हा पहाया तुलागडे
लाजळूनेही लाजण शिकाव बघ तुझ्याकडून
फक्त एक कमी आहे गं तुझ्यात ,
प्रेम करण शिकाव माझ्याकडून..

* सागर बडे *

गेलीस मला जिवंतपणी मारुन | Virah Kavita | विरह कविता Marathi Kavita मराठी कविता :

खुप चांगल केलस,
माझ्याशी Break-Up करुन.....

मनातून खुशी झाली तुला,
माझ्याशी जोडलेलं नातं तोडून.....

खुप छान वागलीस,
गेलीस मला परखं करुन.....

खुप प्रेम केलस माझ्यावर,
खोटं खोटं नाटकी बोलून.....

खुप बरं केलस,
मला एकटं तडफडण्यासाठी टाकून.....

खुप वार केलेस,
चाललीस माझ्या मनावर जखमा कोरुन.....

खुप मस्त राहीलीस,
मला विरहाच्या अग्नीत जाळून.....

खरच खुप खुप आभारी आहे मी तुझा,
तुझ्यावर खरे पण अधुरे प्रेम करुन.....

जगण्याची फसवी आस दाखवलीस,
गेलीस मला जिवंतपणी मारुन.....

गेलीस मला जिवंतपणी मारुन.....

© सुरेश सोनावणे.....

विरह कविता :: विसरू कसा? Marathi Kavita मराठी कविता : Virah Kavita |

आठवायचं नाही म्हंटलं तरी
विसरु शकत नाही तुला
कारण....
विसरण्या साठी सुध्धा
आठवावच लागतं तुला

आठवलं तुला कि
आठवतात भेटी आपल्या
अन.....
विसरून जातो कि ,
विसरायचं तुला

तूच सांग सखे
विसरू कसा तुला?
अगं..
.तुझ्या शिवाय काही,
अठवणीच नाही मला .

ह्या पेक्षा म्हणतो मी
आठवत राहतो तुला
निदान...
माझ्या बरोबर नाहीयेस तू .,
हे विसरायला होईल मला.



केदार.... 

काही कळेना मना कोण कुणाशी खेळत असतं Marathi Kavita : मराठी कविता : Prem Kavita | प्रेम कविता

जे नशीबात असतं ते ह्रदयात... नसतं
जे ह्रदयात असतं ते नशीबात...नसतं
काही कळेना मना कोण कुणाशी खेळत असतं

जे दैवात असतं ते नियतीच्या मनात नसतं
जे नियतीच्या मनात असतं ते कळत नसतं
काही कळेना मना कोण कुणाशी खेळत असतं

जे जीवनात नसतं ते आयुष्यात येत असतं
जे आयुष्यात नसतं ते जीवनाचा भाग बनून जातं
काही कळेना मना कोण कुणाशी खेळत असतं

जे दूरच असतं ते जवळ वाटत असतं
जे जवळ असतं ते आपलं वाटत नसतं
काही कळेना मना कोण कुणाशी खेळत असतं

खरं प्रेमही असंच असतं जरी ते भेटत नसतं
तरी एकही क्षण मन प्रेमावाचून जगू शकत नसतं
काही कळेना मना कोण कुणाशी खेळत असतं .

-संजय एम निकुंभ , वसई

Saturday, October 19, 2013

फक्त एक तुच नाही आहे... Marathi Kavita मराठी कविता | Virah Kavita विरह कविता

खुप दुःख आहे आयुष्यात,
थोडे फार सुख ही आहे.....
पैसा अडका आहे आयुष्यात,
प्रेम न मिळाल्याची गरीबी आहे.....
मित्र मैत्रिणी आहे आयुष्यात,
कोणी जिवाभावाच नाही आहे.....
सर्व काही मिळाले आयुष्यात,
फक्त एक तुच नाही आहे.....
फक्त एक तुच नाही आहे.....

© सुरेश सोनावणे.....

ती खुप बदलली आहे रे... Virah Kavita विरह कविता

पाहताच क्षणी नजरेत भरणारी,
कातिल अदेने घायाळ करणारी,
मनात घर करुन राहणारी,
ह्रदयात ठान मांडून बसणारी.....

कधी मला पाहून गोड लाजणारी,
कधी मध्येच खळखळून हसणारी,
कधी हक्काने रागवणारी,
कधी कडकडून भांडणारी.....

ती खुप बदलली आहे रे...!!

कधी स्वप्नात येऊन सतवणारी,
कधी good morning बोलून
मला उठवणारी,
कधी रात्रभर
जागवणारी,
कधी मनसोक्त गप्पा मारणारी.....

कधी i hate u बोलून छळणारी,
मी i love u म्हणताच मिठीत
घेणारी,
कधी love u बोलताच
same 2 u म्हणणारी,
कधी i like u म्हणुन आवडणारी.....

ती खुप बदलली आहे रे...!!

कधी माझ्यावर जीव ओवळणारी,
मला स्वतःच्या जिवापेक्षा जास्त
जपणारी,
मरेपर्यन्त साथ
देण्याची वचने देणारी,
ती दिलेली सारी वचने
खोटी ठरवणारी.....

कधी माझ्यासाठी झूरणारी,
मी नाही दिसलो की वेडीपिशी होणारी,
सैराभैरा बेचैन होवून मला शोधणारी,
माझ्या आठवणीने व्याकुळणारी.....

ती खुप बदलली आहे रे...!!

डोळ्यातून सरळ ह्रदयात उतरणारी,
तिच्या असण्याने माझे जग
व्यापणारी,
माझे अस्थित्व विसरायला लावणारी,
माझ्या आवती भोवती घुटमळणारी.....

माझ्या डोळ्यात अश्रूं पाहून
रडणारी,
की आता मला रडवणारी,
माझ्या कवितेला दाद देणारी,
माझ्या प्रेम रंगात रंगणारी.....

ती खुप बदलली आहे रे...!!

माझी बायको होण्याचे स्वप्न
पाहणारी,
मलाच सर्वकाही मानणारी, माझ्यावर
जिवापाड प्रेम करते म्हणुन
फसवणारी,
की आता माझा तिरस्कार
करणारी.....

माझ्या सुखात सुख मानणारी,
माझ्या दुःखात सदैव साथ देणारी,
माझी एक क्षणही सोबत न
सोडणारी,
की आता मला एकटं सोडून
जाणारी.....

आता खरच रे मित्रा,
ती खुप बदलली आहे रे...!!

© सुरेश सोनावणे.....