Monday, December 2, 2013

प्रेम आयुष्यात आल्यावर :: Marathi Kavita - मराठी कविता Prem Kavita | प्रेम कविता

====================
जशी कणीक चांगली मळल्यावर
चपाती फुगून वर येते
पाटावरच्या वाटलेल्या मसाल्याची
चव भारीच वेगळी असते

तसचं प्रेमही आयुष्यात आल्यावर
ते एकजीव व्हावे लागते
अपेक्षा अन स्वार्थ दूर सारून
प्रेमाचे होऊन जगावे लागते

तेव्हाच एक घट्ट नाते
मनात तयार होत जाते
दोन जीव एक झाले की
प्रेम फुलत बहरत जाते

मग कितीही येवोत वादळे
त्यास हसत हसत सामोरे जाते
जरी आला कधी दुरावा
मन धुंदीतच जगत रहाते

पण असे प्रेम करणे
खूपच कठीण असते
पण एकदा असे प्रेम झाल्यावर
जगणे सुंदर होत असते .
=======================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ३० .  १ १ . १३  वेळ : ६ . ४५  स.   

मला ही वाटायच, माझं कोणीतरी असायला हवं होतं...:: Marathi Kavita - मराठी कविता Virah Kavita | विरह कविता

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
माझ्यात गुंतणारं,
माझ्यात हरवणारं.....

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
मला आपलं मानणारं,
मला हक्काने भांडणारं.....

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
मला खळखळून हसवणारं,
माझ्या दुःखात सोबत रडणारं.....

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
माझ्या स्वप्नात येणारं,
माझी वाट पाहणारं.....

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
मला सुखात ठेवणारं,
मला फुलासारखं जपणारं.....

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
मला i love बोलून लाजवणारं,
माझे गालगुच्चे घेणारं.....

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
माझ्याशी बोलताना हरवणारं,
डोळ्यात पुन्हा मला शोधणारं.....

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
मला प्रेमाने शोना बोलणारं,
जवळ घेऊन मिठीत सामावणारं.....

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
माझ्या सोबत जगणारं,
मला समजुन घेणारं.....
:'(     :'(     :'(

स्वलिखित -
दिनांक ०१-१२-२०१३...
दुपारी १२,००...
© सुरेश सोनावणे.....