Saturday, June 12, 2010

आपलाच एक मित्र ...

आपलाच एक मित्र ...
सहसा जास्त न बोलणारा......पण खुप काही बोलून जाणारा,मनापासून मैत्री करणारा ..............
जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सोंडून जातात........

काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........

नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........

पण् कुणी दूर गेल तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही..............
तुझ्या मैत्रीचा मी नेहमीच आदर करेन ..........

Thursday, June 10, 2010

कळत - नकळत कस आयुष्य बनत ,

कळत - नकळत कस आयुष्य बनत , जीवनाच गणित डोळ्यांसमोर उलगडत , आईची माया आठवताच मन भरून येत , खरच.. तिच्यासारख आपल्या कुणीही जवळच नसत , तिच्या सोबतीत जीवन स्वर्गापरी भासत , जस परिस लोखंडाला स्पर्श करत , शाळेत असताना मित्रांची सोबत असते , तिथे घडलेल्या सुख- दू:खाला त्यांच्या प्रेमाची झालर असते , त्यांच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण मोलाचा असतो , कारन त्या क्षणाला समजुतपनाचा ओलावा असतो , तरुनाईच्या उम्बरठ्यावर पाउल ठेवताच कस पंख आल्यासारख वाटत , अन उडताना आपल्यावर प्रेम करणार कुणीतरी हव असत , प्रियकराच्या सोबतीत हायस वाटत , अन त्याचा विरह जीवनात पडलेल विरझन वाटत , तरीही सर्व विसरून सुखाने सुरुवात कराविशी वाटते , कारन मागे पडलेल्या पाउलखुना अनुभवाची शिदोरी देते , एखाद्या सायंकाळी निवांतपणे हे सर्व आठवत , अन जीवनाच्या गणितात काय बाकी राहिल हे कळत -नकळत समजुन जात...