Saturday, January 30, 2016

काय सांगू तुला | Marathi Real Sad Love Poems in Marathi

काय सांगू तुला आज काय वाटत होते.
एकटे एकटे झाल्या सारखे आज भासत होते,
मन नव्हते थाऱ्यावर हे दिसत होते
काय सांगू तुला आज काय वाटत होते.

खुश होतास तू तुझ्या जगात ,
पण मी आज एकटी पडले होते,
सगळ्या आठवणी एकवटून
 मी माझीच रडले होते,
काय सांगू तुला आज काय वाटत होते.

भावनांनी छीनविछीन झालेलं
मन घेऊन मी बसले होते,
साऱ्या आठवणी अश्रू होऊन
माझ्यावर हसले होते.
काय सांगू तुला आज काय वाटत होते.

समजावता समजावता त्यांना
दिवस रात्र लोटले होते,
तुझ्या प्रेमात अडकून ,
मी आज कायमची लुटले होते
काय सांगू तुला आज काय वाटत होते.

ऋषिकेश सोनवणे

No comments: