Saturday, August 8, 2015

बस्स झाल आता प्रेम करणं | Prem Kavita | Stop Loving Prem Kavita Online | Love Poems in Marathi

बस्स झाल आता प्रेम करणं
तिच्याच यादेत घुटमळत राहाणं
तीन दिलेल्या प्रेमपत्रांना उत्तर देण
झोपेतही तिचेच स्वप्न पाहत राहाणं

तिन म्हणेल ते निमुटपणे करणं
तिच्या रागाला आपल्यापरीण थमवीन
ती दिसली नाही म्हणून मन विचलित करणं
ती आता तरी येईल म्हणून वाट पाहत बसन
बस्स झाल आता प्रेम करणं .....

तिला पाहण्यासाठी तिच्या गल्लीत जाणं
ती दिसताच तिला इशारे करणं
भेट झाली नसेल तर मेसेज वर भागवण
प्रेमासाठी दोघांनीही शपथा घेण
बस्स झाल आता प्रेम करणं .......

तिच्या सोबत राहिलेल्या क्षणांना अनुभवन
तिने दिलेल्या प्रत्येक गोष्टीला सांभाळून ठेवण
तिचाच साठी आपणही उपाशी राहणं
तिच्या विरहाने तडफडून रडत बसण
बस्स झाल आता प्रेम करणं ................

आता तिच्याही मनात हेच विचार असण
तीच मला पाहून न पाहिल्यासारख करणं
तिच्या प्रेमाच्या प्रवाहात वाहत राहणं
ती आपलीच आहे समजून जीव लावण
बस्स झाल आता प्रेम करणं ..........

                        विजय वाठोरे सरसमकर
                         १२ जुलै २०१५

4 comments:

Anonymous said...

धन्यवाद ! कवितेच्या शेवटी कवीचे नाव टाकल्या बद्दल !

मी विजय वाठोरे सरसमकर मला खूप आनंद झालाय कि माझ्या कविता या माझ्याच नावाने share करत असल्या बद्दल. पुन्हा तुमचे आभार !

Vijay wathore said...

धन्यवाद ! कवितेच्या शेवटी कवीचे नाव टाकल्या बद्दल !

मी विजय वाठोरे सरसमकर मला खूप आनंद झालाय कि माझ्या कविता या माझ्याच नावाने share करत असल्या बद्दल. पुन्हा तुमचे आभार !

Unknown said...

तुमचा फोन नंबर द्या pzzz

Vijay wathore said...

vijay khetmalis sir

majha phone no. 9975593359
9049588748