Friday, August 28, 2015

एक चुक होती माझी | Beautifull Prem Kavita | Marathi Poems in Marathi Font Language

तिने माझ्यावर कधी प्रेम
केलच नाही ...
आणि मि तिच प्रेम
समजून बसलो ...
.
एक चुक होती माझी. ..
तिच्या क्षण भराच्या
हसण्यावर ...
मी प्रेम समजून बसलो ...
.
एक चूक होती माझी. ..
ति प्रत्येक गोष्टीवर "हा"
बोलायची ...  आणि
मी ते खरं समजून बसलो ...
.
एक चुक होती माझी. ..
तिने माझ्यापेक्षा तिच्या
मित्रांना जास्त जवळ केलं.
आणि मी तिची ती सवय
समजून बसलो ....
.
एक चुक होती माझी...
तिने मला सांगितलं पण
होत ....
कुणी दुसरा आहे तिच्या
आयुष्यात ..
पण मीच स्वतःला
तिच आयुष्य समजून बसलो ...
.
एक चूक होती माझी...
मी तिचा कधी नव्हतोच
पण ....
मीच तिला माझी
समजुन बसलो ....
.
स्वलिखीत :- Prem Mandale (Cute Prem)

तुझे माझे कधी पटतच नाही | Prem Kavita For GirlFriend | Prem Kavita in Marathi Langauge | Poems in Marathi

तुझे माझे कधी पटतच नाही,
तरीपण तू नसली तर मला करमत नाही,
दिव्याच्या वातीने जळतो तो पतंग,
तरी दिव्याजवळ घुटमळने तो सोडत नाही,
तसच तुझे माझे कधी पटतच नाही,
तरीपण तू नसलीस की मला करमत नाही
एक दिवस जरी नाही भांडलो आपण तर तो दिवस
मला दिवस वाटत नाही
माझ्या रागातही तुझ्याबाद्दलाचे प्रेम असते हे
का तुला दिसत नाही,
सवय झाली आहे तुझी तुझ्याशिवाय मला आता ते
जगण जगणंच वाटत नाही

सोम 

का तरीही | Dukhi Marathi Kavita Online Blog | Marathi Virah Kavita Online

कोमजले आहे सारे आता माहित असूनही ;
का मी पुन्हा फुलामध्ये गंध शोधतो आहे !

लावूनी पंख फुलपाखराचे इवलसे जरासे ;
का मी पुन्हा तुझेच पाऊलखूणा शोधतो आहे !

विरले आहे सारे आता माहित असूनही ;
का मी पुन्हा पापण्यात स्वप्न रंगवित आहे !

घेवूनी थोडे रंग उसणे नभातले इंद्रधनूकडून ;
का मी पुन्हा स्वप्नात तुलाच रंगवित आहे !

गुरफटले आहे आता सारे माहित असूनही ;
का मी पुन्हा ओठावर तुझे नाव गुणगुणतो आहे !

अडखळलेले शब्द सारे अबोल ओठातले फुलवून ;
का मी पुन्हा काव्याचा लाटावरुन उधळीत आहे !

...... स्वप्नील (अबोल मी )

Saturday, August 8, 2015

हवी आहे साथ | Marathi Motivational Kavita Online | Motivational Marathi Kavita Blog | Motivational Marathi Blog

सखोल ज्ञान ही विशेषता पुस्तकाची ,
त्यासाठी पुस्तकाला हवी साथ  ज्ञानाची…

निर्मळ संस्कार ही विशेषता संतांची ,
त्यासाठी संतांना हवी साथ संस्कारांची…

त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ सर्वोज्ञानाची …
नि हृदयाला हवी आहे साथ संस्कारांची …

सर्वज्ञान आणि सुसंस्कारांच्या संगतीनेच ,
पूर्ण होऊ शकते यात्रा या सुंदरमय  जीवनाची।।१।।

तेजोमय प्रकाश ही विशेषता सुर्याची ,
त्यासाठी सूर्याला हवी साथ  प्रकाशाची…

सुगंधित दरवळ ही विशेषता फुलाची ,
त्यासाठी फुलाला हवी साथ सुगंधाची …

त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ सुविचारांची…
नि हृदयाला हवी आहे साथ प्रेमाची…

सर्वोच्च विचार आणि प्रेमाच्या संगतीनेच ,
पूर्ण होऊ शकते यात्रा या रहस्यमय जीवनाची।।२।।

उत्कृष्ट कला ही विशेषता कलाकाराची ,
त्यासाठी कलाकाराला हवी  साथ कलेची …

शांत चित्त विशेषता आनंदी हृदयाची ,
त्यासाठी हृदयाला हवी साथ शांत चित्ताची …

त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ कलेची  …
नि हृदयाला हवी आहे साथ शांत मनाची  …

स्मित हास्य आणि शांत मन यांच्या संगतीनेच ,
सुरु ठेवावी यात्रा या आनंदमय  जीवनाची।।३।।

वेदांती

एकदा तरी बोल ना | Prem Kavita Dukhi | Online Prem Sad Virah Kavita

एकदा तरी बोल ना
शांतीच गुपीत खोल ना
ह्र्द्यामध्ये रहातेस
जीवनी माझ्या ये ना

एकदा तरी बोल ना
दूरुन हसण्याच गुपीत खोल ना
ते तीन शब्द बोल ना

एकदा तरी बोल ना
लाजण्याच गुपीत तू खोल ना
प्रेम करते माझ्यावर
एकदा तू सांग ना

एकदा तरी बोल ना
प्रेमाच गुपीत तू खोल ना
माझी आर्धांगनी तू बन ना

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक

तू नाहीस म्हणून | Sad Dukhi Kavita Online | Sad Prem Kavita | Marathi Sad Kavita Blog

आज पाऊस ही रुसला
तू दूर गेली म्हणून.
प्रेमाचा या दरीत
मन कोसळले म्हणून.

तूच आस केलीस
जाणून बुजुन.
बग जरा तरी
तुझे हे मन वाचून.

कोणीच नाही दिसणार
तुला माझ्या वासुन.
फार झाल आता जगन
तुझ्या वासुन.

मन चालले तुझ्या
वासुन आज झिजून.
मी टाकिल आज स्वताला
तुझ्या विन जाळून.

आज डोळ्यातले पाणी
गेले रुझुन.
होंठावर चे हासू गेले
वाहून.

आज तू नाहीस म्हणून
आज तू नाहीस म्हणून.
फक्त तू नाहीस म्हणून.

              बबलु 

सोप आहे प्रेम करण | Prem Kavita | Love Kavita Marathi | Poems in Marathi Font

सोप आहे प्रेम करण
पण कठीण आहे ते टिकवण
सोप आहे प्रेम करण
पण कठीण आहे ते तीला सांगण
सोप आहे नाव हातावर लिहीण
पण कठीण आहे ते ह्रदयावर लिहीण
सोप आहे ह्रदयात कुणाला बसवण
पण कठीण आहे विरह सहन करण
सोप आहे स्वप्न बघण
पण कठीण आहे स्वप्नातील व्यक्ती आपली करण
सोप आहे आठवण काढण
पण कठीण आहे डोळ्यातील अश्रु लपवण
सोप आहे समोर आल्यावत हसण
पण कठीण आहे ते हसु कायम टीकवण
सोप आहे…………………………………..
श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक

कसा विसरु तुला | Virah Sad Poems in Marathi | Dukhi Love Poems in Marathi | Dukhi Prem Kavita Online Blog

तु बोलुन मोकळी झालीस
की विसरुन जा मला
पण मी काय करु
विसरताच येत नाहीना मला :(

तुझ्यासाठी सहज सोप असेल ग
सार काही विसरुन जाणं
पुन्हा नव्याने सुरुवात करणं
अन पुढे चालायला लागणं

पण माझ तस नाहीये ग
मी अजुनही आठवणींवर जगतोय
झाल्या गेल्या भेटींनी साठवतोय
कधी हसतोय कधी रडतोय :'(

आठवण्याशिवाय एक तुला
काहीच सुचत नाही मला
आता तुच सांग ग मला
कसा विसरुन जाउ तुला. :(
कवी-गणेश साळुंखे.

बस्स झाल आता प्रेम करणं | Prem Kavita | Stop Loving Prem Kavita Online | Love Poems in Marathi

बस्स झाल आता प्रेम करणं
तिच्याच यादेत घुटमळत राहाणं
तीन दिलेल्या प्रेमपत्रांना उत्तर देण
झोपेतही तिचेच स्वप्न पाहत राहाणं

तिन म्हणेल ते निमुटपणे करणं
तिच्या रागाला आपल्यापरीण थमवीन
ती दिसली नाही म्हणून मन विचलित करणं
ती आता तरी येईल म्हणून वाट पाहत बसन
बस्स झाल आता प्रेम करणं .....

तिला पाहण्यासाठी तिच्या गल्लीत जाणं
ती दिसताच तिला इशारे करणं
भेट झाली नसेल तर मेसेज वर भागवण
प्रेमासाठी दोघांनीही शपथा घेण
बस्स झाल आता प्रेम करणं .......

तिच्या सोबत राहिलेल्या क्षणांना अनुभवन
तिने दिलेल्या प्रत्येक गोष्टीला सांभाळून ठेवण
तिचाच साठी आपणही उपाशी राहणं
तिच्या विरहाने तडफडून रडत बसण
बस्स झाल आता प्रेम करणं ................

आता तिच्याही मनात हेच विचार असण
तीच मला पाहून न पाहिल्यासारख करणं
तिच्या प्रेमाच्या प्रवाहात वाहत राहणं
ती आपलीच आहे समजून जीव लावण
बस्स झाल आता प्रेम करणं ..........

                        विजय वाठोरे सरसमकर
                         १२ जुलै २०१५