Saturday, June 12, 2010

आठवण आली तुझी की,

आठवण आली तुझी की, नकळत डोळ्यांत पाणी येतं.. मग आठवतात ते दिवस जिथं आपली ओळख झाली.. आठवण आली तुझी की, माझं मन कासाविस होतं मग त्याच आठवणीना.. मनात घोळवावं लागतं.. आठवण आली तुझी की, वाटतं एकदाच तुला पाहावं अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं.. पण सलतं मनात ते दुःख.. जाणवतं आहे ते अशक्य... कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य... पण तरिही......... आठवण आली तुझी की, देवालाच मागतो मी.... नाही जमलं जे या जन्मी मिळू देत ते पुढच्या जन्मी....

हा जीव सरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

हा जीव सरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी हा दगड पाझरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी ठोके काळजाचे आजही चुकतात अधुन मधुन कधी श्वास गुदमरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी आजही मी त्या वाटा चुकतो कधी तरी तेव्हा रस्ता बदलला होता फ़क्‍त तुझ्यासाठी तेव्हां तुला पावसाची ओढ लागे सदा काळी ग्रीष्मात मेघ बरसला होता फ़क्‍त तुझ्यासाठी तुझी प्रित सदा त्या उसळत्या लाटांवरी हा किनारा झरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी आजही तु म्हणे लाल हात रंगवतेस कधी तेव्हां माझा रंग उडाला होता फ़क्‍त तुझ्यासाठी फ़ार मोठा इतिहास तुझ्या छोट्याश्या प्रेमाचा तो मी शब्दात कोरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी सारच मी जिकंत आलो आजवर पण मी हा जुगार हरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी तुझ मोठ होण्याच स्वप्नं होत म्हणूनच हा निवडूंग बहरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी.

नेहमीच कसं हसवायचं…??

नेहमीच कसं हसवायचं…??
तूच सांग देवा असं किती दिवस चालायचं…
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…??
समोरचा तो हसला………… ….नव्हे!
हसवण्यावर माझ्या फसला!!
त्याच्या समोर रडलोच् तर…
हसवणाराच् मी कसला…

माणसांच्या या गर्दीमध्ये स्वतःला मात्र विसरायचं…
दू:ख दाबून ओठांमध्ये , त्यांतच हसून दाखवायचं
पण …. श्वास जड होतो जेव्हा—…तेव्हा रे काय करायचं???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…!!!

मी रडू लागलो जेव्हा …
ते मात्र हसत होते…
कारण, माझ्या रडण्यामधले
व्यंगच त्यांना दिसत होते…

मनातलं सर्व मनातच ठेवून, हसून मग मी दाखवायचं,..
शिषीरा नंतर येतो वसंत…….स्वप्नंच् फक्त पहायचं
पण; ……..ह्रूदयातच ढग दाटून येतो….तेव्हा रे काय करायचं….???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…!!!

आपलाच एक मित्र ...

आपलाच एक मित्र ...
सहसा जास्त न बोलणारा......पण खुप काही बोलून जाणारा,मनापासून मैत्री करणारा ..............
जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सोंडून जातात........

काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........

नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........

पण् कुणी दूर गेल तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही..............
तुझ्या मैत्रीचा मी नेहमीच आदर करेन ..........

Thursday, June 10, 2010

कळत - नकळत कस आयुष्य बनत ,

कळत - नकळत कस आयुष्य बनत , जीवनाच गणित डोळ्यांसमोर उलगडत , आईची माया आठवताच मन भरून येत , खरच.. तिच्यासारख आपल्या कुणीही जवळच नसत , तिच्या सोबतीत जीवन स्वर्गापरी भासत , जस परिस लोखंडाला स्पर्श करत , शाळेत असताना मित्रांची सोबत असते , तिथे घडलेल्या सुख- दू:खाला त्यांच्या प्रेमाची झालर असते , त्यांच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण मोलाचा असतो , कारन त्या क्षणाला समजुतपनाचा ओलावा असतो , तरुनाईच्या उम्बरठ्यावर पाउल ठेवताच कस पंख आल्यासारख वाटत , अन उडताना आपल्यावर प्रेम करणार कुणीतरी हव असत , प्रियकराच्या सोबतीत हायस वाटत , अन त्याचा विरह जीवनात पडलेल विरझन वाटत , तरीही सर्व विसरून सुखाने सुरुवात कराविशी वाटते , कारन मागे पडलेल्या पाउलखुना अनुभवाची शिदोरी देते , एखाद्या सायंकाळी निवांतपणे हे सर्व आठवत , अन जीवनाच्या गणितात काय बाकी राहिल हे कळत -नकळत समजुन जात...