तू कॉल करणार होतास
संध्याकाळ होतेय
वादळ घोंघावतंय
मी गच्चीत उभी
मृदगंध नकोसा वाटतोय
त्या दिवशी महत्वाचं बोलणं अर्धच राहिलं..
तू कॉल करणार होतास..
भरलेलं आभाळ गप्पं कोसळतंय
पाकोळ्या भिरभिरताहेत
माझं लक्ष वारंवार फोनकडे
गार वारा झोंबतोय
बिझी असशील पण तरीही..
तू कॉल करणार होतास..
शेवटचा किरण धरतीला भेटून चाललाय
पक्षी घरट्याकडे निघालेत
घरांमध्ये दिवे लागलेत
ओला पाऊस जाळतोय
मीच कॉल केला असता पण..
तू कॉल करणार होतास..
झाडांमध्ये रात्र विसावलीय
विजा चमकताहेत
मी अजूनही गच्चीवरच
टिटवीचा आवाज छळतोय
तुला ठाऊक आहे,मी काळजी करते..
तू कॉल करणार होतास..
सगळीकडे अंधार झालाय अन चिखलही
एकेक पायरी उतरणं जड जातंय
स्वप्नात तरी भेटशील ?
ठीक आहे,आज नाही तर पुन्हा कधीतरी..
तू कॉल करणार होतास..
पण,कदाचित डेड असेल..फोन....की....आपलं नातं ?
Friday, August 13, 2010
Saturday, August 7, 2010
नाती...
मलाही वाटते नाते असावे
मलाही कुणि आपले असावे
पण मग एकच गोष्ट
माझ्या मनात येते....
आलो असेच आणि जाणारही असेच
मग का कुणाचे रेशमी बंध
मलाही नाती आहेत.... नाही होती
मलाही त्यांची जपणूक होती...
एक शब्दावर मरण्यासाठी
माझीही तेव्हा तयारी होती
मीही फुलवल्या शब्दांच्या बागा
शब्द खाली पडू न देण्याच्या आणाभाका
पण नातीच कधी फासे असतात
आणि नातीच कधी फास होतात
आयुष्य पिळून काढले तर, तेव्हा
नात्यांचेच फक्त भास उरतात..........
................................संदिप उभळ्कर
मलाही कुणि आपले असावे
पण मग एकच गोष्ट
माझ्या मनात येते....
आलो असेच आणि जाणारही असेच
मग का कुणाचे रेशमी बंध
मलाही नाती आहेत.... नाही होती
मलाही त्यांची जपणूक होती...
एक शब्दावर मरण्यासाठी
माझीही तेव्हा तयारी होती
मीही फुलवल्या शब्दांच्या बागा
शब्द खाली पडू न देण्याच्या आणाभाका
पण नातीच कधी फासे असतात
आणि नातीच कधी फास होतात
आयुष्य पिळून काढले तर, तेव्हा
नात्यांचेच फक्त भास उरतात..........
................................संदिप उभळ्कर
Subscribe to:
Posts (Atom)