Sunday, July 25, 2010

मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची

मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची
गजावर झुकलेल्या रातराणीसारखी
नजर तुझी झुकायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!!

निंबोणीच्या झाडामागचा
चंद्रही गालात हसायचा
आभाळातल्या ढगालाही गुपित तुझ सांगायचा
त्याच्यावर उगी तू रागवायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!

कळी कळी वेचतांना तू
फुलाच्या कानात बोलायची
मी कितीही विचारल तरी आम्ही नाही जा म्हणायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची ....!!

तुझ मात्र बर आहे,येण जाण ही सुरु आहे
मागे वळून पाहतांना काळीज तोडून नेण आहे
भुवई ऊडवत जायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!

असे हे किती दिवस चालायच,मुकेपणातच बोलायच
सारे संकेत कळून सुध्दा न कळल्यागत करायच
अन डोळे मोठे करुन पाहायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!


आता मात्र सोसत नाही,
दिवस काय पण रात्र ही तुझ्याशिवाय जात नाही
असं का व्हावं म्हणून विचारल तरी का ?लाच कारण नसत म्हणायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!!

प्रेम

प्रेम करतोस ना तिच्यावर,
मग कर फ़क्त प्रेमाचा वर्षाव,
तिने ही कराव प्रेम म्हणून
आणायचा नसतो दबाव....
असेल तिचा नकार, तर
तो हि तू हसत स्विकार,
तिलाही आहे ना स्वत:चा
निर्णय घेण्याचा अधिकार...
नाही म्हणाली तर तूझ्या
प्रेमाने नकाराला होकारात बदल,
का नाही म्हणाली याचा विचार
करुन आधी स्वत:ला बदल...
नाही म्हणाली तर तिच्या
नकारावरही प्रेम कराव,
नाही म्हणता म्हणता तिला
प्रेम करायला शिकवाव...
नको रे घेउस तूझ्या वेड्या
हट्टा पाई तिचा बळी,
काय मिळणार तूला तोडून
एखादी उमलणारी कळी...
खरे प्रेम करतोस ना,
मग ठेव सच्ची निती,
कशाला दाखवतोस उगाच
तिला जिवाचि भिती...
तूझे हे सच्चे रुप पाहून
कदाचित बदलेल तिचा विचार,
तिलाही होईल बघ मग
तुझ्या प्रेमाचा आजार...
अखेर तरीही नसेल तिचा होकार
तर तूही घे अवश्य माघार,
कशाला मांडतोस लेका असा
एकतर्फी प्रेमाचा बाजार...

आठवण माझी आली कधी

आठवण माझी आली कधी
तर पापण्या जरा मीटून बघ.
सरलेल्या क्षणांमधले
संवाद जरा आठवून बघ.

आठवण माझी आली कधी
तर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ
त्या पाउल वाटेवरती
उमटलेली आपली पाउले बघ.

आठवण माझी आली कधी
तर उडणार्या पक्षांकडे बघ.
त्यांच्यासारखाच माझ मन
तूज्याकडे धावत आलेलं बघ.

आठवण माझी आली कधी
तर चांदण्या जरा मोजून बघ.

चांदण्या रात्रि घेतलेल्या शपथेचा
शब्द न शब्द आठवून बघ.

आठवण माझी आली कधी
तर सागरकिनारी जाऊन बघ.
हजारदा किनार्याला मीठीत घेऊन सुद्धा
परतणाऱ्या नीराश लाटेच वीरघळन बघ.

आठवण माझी आली कधी
तर साद मला घालून बघ
तुझ्या अवतीभोवती फीरणार
माझ अस्तित्व जरा जाणवून बघ.


----अनघा----